पूर्ववैमनस्यातून वडगाव शेरीत तरुणाचा खून; पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार

By विवेक भुसे | Updated: November 2, 2023 11:47 IST2023-11-02T11:47:08+5:302023-11-02T11:47:25+5:30

पूर्ववैमनस्यातून राठोड याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरु

Murder of young man in Vadgaon Sheri due to past enmity Stabbed by five to six people | पूर्ववैमनस्यातून वडगाव शेरीत तरुणाचा खून; पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून वडगाव शेरीत तरुणाचा खून; पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार

पुणे : वडगाव शेरी परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  पाच ते सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन खून केला. अभिषेक  राठोड (वय ३१, रा़ चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिषेक बुधवारी (१नोव्हेंबर) रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत परिसरातून निघाला होता. त्यावेळी पाच ते सहा जणांनी त्याला अडवले. राठोड याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. राठोडला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पूर्ववैमनस्यातून राठोड याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: Murder of young man in Vadgaon Sheri due to past enmity Stabbed by five to six people