Mpsc Student Suicide: पुण्याच्या दौंड तालुक्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:02 IST2021-12-17T19:57:21+5:302021-12-17T21:02:11+5:30
राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Mpsc Student Suicide: पुण्याच्या दौंड तालुक्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
खोर : दौंड तालुक्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मल्हारी नामदेव बारवकर (वय २५ वर्ष ) असे या युवकाचे नाव आहे. राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात मल्हारी बारवकर यांचे चूलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्हारी बारवकर हा महाराष्ट राज्य लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करत होता. त्याने या आधी तीन ते चार पेपर देखील दिले आहेत. आता मल्हारीची येत्या २ जानेवारीला पूर्व परीक्षा होणार होती. मात्र सततच्या परीक्षा पुढे ढकलत असल्याने तो नाराज झाला होता. त्यातच त्याच्या या परीक्षा सराव साठी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी जमीन विकून पैसे उभे केले होते. मात्र वडिलांची अपेक्षा पूर्ण करताच आज शुक्रवार दि.१७ रोजी सायंकाळच्या चार च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हारी हा बापाचा एकुलता एक मुलगा होता तर बहीण ही विवाहित आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही
मल्हारी बारवकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठी मध्ये त्याने मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही. तुमचे पडालेले चेहरेही मी पाहु शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यताही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगल्या जगण्याच्या आशा संपल्या आहेत, सॉरी असे त्याने लिहून ठेवले आहे.