Pune: गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर बलात्कार; खडकवासला येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 21:01 IST2023-07-12T21:01:07+5:302023-07-12T21:01:39+5:30
पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

Pune: गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर बलात्कार; खडकवासला येथील घटना
पुणे : शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना जून २०२३ ते रविवार (दि. १०) दरम्यान खडकवासला येथे घडली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा आरोपीने पाठलाग केला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने तिला मी तुला लाईक करतो असे म्हणून खडकवासला येथे नेले. शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे फिर्यादीत नमूद आहे.