Maval Lok Sabha Result 2024:मावळचे खासदार श्रीरंग बारणे; घासून नाही तर ठासून आले, दीड लाख मतांनी विजयी

By विश्वास मोरे | Published: June 4, 2024 04:34 PM2024-06-04T16:34:08+5:302024-06-04T16:34:35+5:30

Maval Lok Sabha Result 2024 'घासून नाही'तर ठासून बारणे आले, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली आहे

Maval Lok Sabha Result 2024 Maval MP Srirang Barane winning by one and a half lakh votes losses sanjog waghere patil | Maval Lok Sabha Result 2024:मावळचे खासदार श्रीरंग बारणे; घासून नाही तर ठासून आले, दीड लाख मतांनी विजयी

Maval Lok Sabha Result 2024:मावळचे खासदार श्रीरंग बारणे; घासून नाही तर ठासून आले, दीड लाख मतांनी विजयी

Maval Lok Sabha Result 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची शेवटची फेरी पूर्ण झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. घासून वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी असल्याचे दिसून आले. शेवटच्या फेरीत दीड लाख मते मिळवत विजयी वाटचाल केली आहे. 'घासून नाही'तर ठासून बारणे आले, अशी प्रतिक्रिया बारणे  (Shrirang Barne) यांनी दिली आहे. संजोग वाघेरे हे २ नंबरला होते. त्यांचा पराभव झाला आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल सुरू आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली सुरुवातीच्या कालखंडामध्ये मतमोजणीचा वेग कमी होता. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास दहा वाजले.

या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे (Sanjog Waghere Pati) यांच्यासह ३३ उमेदवार रिंगणात होते.(Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे यांची आघाडी कायम होती. दुपारी साडेतीनपर्यंत दुपारी अडीच पर्यंत २५ फेऱ्या झाल्या होत्या मात्र, त्यांचे निकाल बाहेर आले नव्हते. 
पोलिंग एजंटच्या माहितीनुसार बारणे यांनी दीड लाखांनी बारणे विजयी झाले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. सव्वादोनच्या सुमारास श्रीरंग बारणे मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. 'झाली रे झाली हॅट्रिक झाली, असा जल्लोष समर्थक यांनी केला. भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. 

 का झाला निकाल जाहीर होण्यास उशीर!

मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या वेळेस काही यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुपारी निकाल जाहीर होण्याचे काम थांबले होते. तांत्रिक अडचणीमुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

 महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो!

 खासदार बारणे म्हणाले, मावळच्या जनतेने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मावळमधील सहाही आमदार, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केले. त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. दहा वर्षे मतदारसंघात जनतेशी, नागरिकांशी एकरूप राहून काम केले. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. शहरात माझा एक लाख हक्काचा मतदार आहे. शहरातील जनतेने पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकला. मावळच्या जनतेचे आभार मानतो. राज्यातील चित्र वेगळे असताना माझा लाखोच्या फरकाने विजय होत आहे. लोकांशी एकरूप राहून काम केल्याचा विजय आहे. मतदारांना, महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो.'

Web Title: Maval Lok Sabha Result 2024 Maval MP Srirang Barane winning by one and a half lakh votes losses sanjog waghere patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.