Maharashtra Election 2019: कोथरूडकर जावयाचा पाहुणचार करतील, घरजावई करून घेणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:22 IST2019-10-03T14:18:34+5:302019-10-03T14:22:23+5:30
कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे.

Maharashtra Election 2019: कोथरूडकर जावयाचा पाहुणचार करतील, घरजावई करून घेणार नाहीत
पुणे : कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ मनसेच्या शिंदे यांनीही आज एक अर्ज भरला. तर दुसरा अर्ज ते उद्या शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून भरणार आहेत. बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी आयात उमेदवार विषयावर 'मी परका नसून पुण्याचा जावई आहे' असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
आज अर्ज भरल्यावर ते म्हणाले की, ही लढत अत्यंत चांगक्या प्रकारे होणार आहे. मी ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी लढत मानतो. मी इथला स्थानिक उमेदवार आहे, यापूर्वी दोन निवडणुका लढवल्या आहेत. मतदान हे गुप्त असते तसेच लोकांचे मनही गुप्त असते. ते त्यांना हव्या असलेल्या व्यक्तीलाच मतदान करतात. कोथरूडची जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. त्यांना जावयाचा पाहुणचार कसा करायचा हे माहिती आहे.खायला वगैरे घालून पाठवून देतील.पण घरजावई पद्धत आमच्याकडे नाही.