महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 14:00 IST2019-10-22T13:56:42+5:302019-10-22T14:00:26+5:30
Pune Election 2019 : पोलिसांचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची धाकधूक वाढली..

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’
पुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. शनिवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत प्रचाराची सांगता झाली. सोमवारी जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव साजरा करत नागरिकांनी मतदान करत जवळपास २४६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले.
जिल्ह्यात सोमवारी मतदानावर पावसाचे सावट होते. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदानावर परिणाम होईल असे चिन्ह होते. मात्र, सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जुन्नर तालुक्यातून ११, आंबेगाव ६, खेड आळंदी ९, दौंड १३, इंदापूर १५, बारामती १०, पुरंदर ११, भोर ७, मावळ ७, चिंचवड ११, पिंपरी १८, भोसरी १२, वडगावशेरी १२, शिवाजीनगर १३, कोथरूड ११, खडकवासला ७, पर्वती ११, हडपसर १४, पुणे कॅन्टोंमेंट २८, तर कसबा मतदारसंघातून १० असे २४६ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. निवडणूक निकाल गुरुवारी (दि. २४) लागणार आहे. तोपर्यंत सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
.........
सकाळपासूनच मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये होता. दुपारनंतर मतदानाचा ओघ कमी झाला. मात्र, सायंकाळनंतर मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला.
......