लोकसभा निवडणूक : पुणे आणि बारामतीसाठी असणार एवढे पोलिसदल, जाणून घ्या आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 21:50 IST2019-04-22T21:48:51+5:302019-04-22T21:50:09+5:30
शहरात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रथमच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचे कर्मचारी असा ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़.

लोकसभा निवडणूक : पुणे आणि बारामतीसाठी असणार एवढे पोलिसदल, जाणून घ्या आकडेवारी
पुणे : शहरात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रथमच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचे कर्मचारी असा ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़. त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा बंदोबस्त असणार आहे़.
एकूण पोलीस बंदोबस्त
१० पोलीस उपायुक्त,
२० सहायक पोलीस आयुक्त,
९१ पोलीस निरीक्षक,
४३८ सहायक/उपनिरीक्षक,
५ हजार १०४ पोलीस कर्मचारी,
१ हजार ८२८ होमगार्ड
२ सीआरपीएफ कंपन्या,
१ एसएपी कंपनी,
१ आरपीएफ कंपनी
आणि ३ एसआरपीएफ कंपन्या़
४ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पुणे शहरातील ४ हजार १५१ जणांवर विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़.या काळात एकूण ६५ जणांना तडीपार करण्यात आले असून ३६ पिस्तुले जप्त केली गेली आहेत़. परवाना धारकांकडून आतापर्यंत ५८४ शस्त्रे जमा करण्यात आली आहे़. १० जणांना स्थानबंद करण्यात आले आहे़. ज्यांच्यावर किमान एक गुन्हा दाखल आहे, अशा ७ हजार २७१ जणांची यादी गुन्हे शाखेने तयार केली आहे़. गेल्या दोन दिवसांपासून त्यातील गुन्हेगारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे़.
३६ तास ऑन ड्युटी
मतदानाच्या काळात पोलीस किमान ३६ तास ऑन डयुटी असणार आहेत़. विशेषत: जे पोलीस कर्मचारी व होमगार्ड ईव्हीएम मशीनबरोबर ज्यांची ड्युटी लावण्यात आली आहे, ते सोमवारी सकाळी ईव्हीएम मशीन समवेत इतर कर्मचाऱ्यांबरोबर मतदानाच्या बुथवर गेले आहेत़. मतदान पूर्ण झाल्यानंतर इव्हीएम मशीन प्रत्यक्ष स्टॉगरुममध्ये जमा होईपर्यंत त्यांची ड्युटी असणार आहे, असे पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले़.