वायररोप तुटून क्रेनचे बकेट विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:18 IST2024-04-30T13:17:40+5:302024-04-30T13:18:22+5:30
कोळवडी (ता. भोर) येथील ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर ही घटना घडली.....

वायररोप तुटून क्रेनचे बकेट विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना
नसरापूर (पुणे) : विहिरीचे खोदकाम करण्यासाठी क्रेनच्या टपामध्ये बसून विहिरीत उतरत असताना वायररोप तुटून क्रेनचे बकेट विहिरीत पडल्याने मजूर ठार झाल्याची घटना सोमवारी ( दि २९) दुपारी २ वाजेच्या दरम्यान भोर तालुक्यातील कोळवडी येथे घडली. अंकुश प्रभाकर गेडाम (वय २३, रा. गडचिरोली) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या दुर्घटनेत विजेंद्र रामानंद भारद्वाज (वय ४९ रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या अपघातातून सुरक्षित वाचवलेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेतली जात आहे.
कोळवडी (ता. भोर) येथील ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर ही घटना घडली. कोळवडी येथील जलजीवन योजनेतील विहिरीचे खोदकाम करण्याकरिता दोन महिलांसह आठ मजूर क्रेनच्या टपामध्ये बसून उतरत होते; मात्र अचानक वायररोप तुटून क्रेनचे बकेट विहिरीत पडल्याने मजूर ५० फूट विहिरीत कोसळले. दुसऱ्या क्रेनच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.