Income Tax Raid: दौंडच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाची ३६ तासापासून चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:39 IST2021-10-08T18:37:58+5:302021-10-08T18:39:49+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांच्या संबंधित दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यावर (Income tax department) आयकर विभागाने छापा टाकला

Income Tax Raid: दौंडच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाची ३६ तासापासून चौकशी सुरु
देऊळगावराजे : दौंड तालुक्यातील आलेगाव येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांच्या संबंधित दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यावर आयकर विभागाने काल सकाळी छापा टाकला. त्यानंतर आज छत्तीस तासानंतर सुद्धा आयकर विभागाचे पथक कारखान्याच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून होते.
सदर पथकांंची कारखान्याच्या मुख्य ऑफिस मध्ये चौकशी सुरू असून ऑफिसच्या गेटवर पोलीस व सी आर पी एफ जवानांचा खडा पहारा आहे. काल प्रमाणे आजही एकाही व्यक्तीला जाण्याऐण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र चौकशीत काय निष्प्पन्न झाले हे अद्याप अधिकृत माहिती आयकर विभागाकडुन मिळालेली नाही.
दौंडचा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान
दौंड सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यासाठी माजी आमदार. बाळासाहेब जगदाळे यांनी प्रयत्न केले. या भागातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जावा यासाठी दौंड सहकारी साखर कारखान्यासाठी प्रयत्न केला. परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे तो कारखाना सहकारी होऊ शकला नाही.
दौंडचा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. तालुक्यात चार कारखान्यांपैकी सर्वाधिक बाजार भाव हा कारखाना शेतकऱ्यांना देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नाळ या कारखान्यासोबत जोडलेली आहे. या कारखान्याचे नियोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.