Daund News: दौंड शहरात भरदिवसा घरफोडी; पावणेदोन लाखाचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 19:04 IST2023-07-12T19:03:06+5:302023-07-12T19:04:01+5:30
या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली...

Daund News: दौंड शहरात भरदिवसा घरफोडी; पावणेदोन लाखाचे दागिने लंपास
दौंड (पुणे) : येथील शिवराज नगरमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयांची घरफोडी केली आहे. या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दीपक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. तेव्हा बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
यापूर्वी शिवराज नगरमध्ये दरोडे, घरफोड्या झालेल्या आहेत. या परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक जीवराज पवार यांनी केली आहे.