पुण्यात १२८ वर्षात प्रथमच असे घडणार; गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 14:18 IST2020-08-18T14:18:01+5:302020-08-18T14:18:47+5:30
पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचा निर्णय

पुण्यात १२८ वर्षात प्रथमच असे घडणार; गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना गणेश मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.
उत्सवाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ झाला आहे पण आजवर इतिहासात कधी असे घडले नव्हते. सरकार आणि प्रशासनाचे आभार मानतो की आम्हाला साधेपणाने उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली. बाप्पाच्या दर्शनाला कुणी येऊ नका, उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नका. 20 सप्टेंबर पर्यंत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली तर ते उत्सवाचे यश असेल. मंडपात आरोग्य शिबीरे घेतली जाणार इतर मंडळांनी त्याचे अनुकरण करावे. - श्रीकांत शेटे.
..............................
महापालिका आचारसंहिता लागू केली आहे त्याचे तंतोतंत पालन केले जाईल
2005 दुष्काळ असल्यामुळे कृत्रिम हौदात मूर्ती विसर्जन करा महापालिकेने जे आवाहन केले की फिरत्या हौदाचे स्वागत करतो रस्त्यावर भक्त उतरले तर संसर्ग वाढेल आठ मंडळे विसर्जनाचा निर्णय एकत्रितपणे घेतील. - विवेक खटावकर