Pune: भोरमध्ये साडेचार किलो गांजा पकडला; एकाला अटक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 20:32 IST2024-03-06T20:30:44+5:302024-03-06T20:32:02+5:30
साडेचार किलो गांजा पकडून गांजा विक्री करणाऱ्याला एकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे...

Pune: भोरमध्ये साडेचार किलो गांजा पकडला; एकाला अटक, गुन्हा दाखल
भोर (पुणे) :भोर पोलिसांनी साडेचार किलो गांजा पकडून गांजा विक्री करणाऱ्याला एकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार दत्तात्रय शांताराम खेंगरे वय ३४ वर्ष यांनी फिर्याद दिली आहे. भोर पोलिसांनी अजय किसन गुमाने (वय २१, रा. अनंत नगर झोपडपट्टी, भोर) याला गांजा विक्री करताना अटक केली आहे.
मंगळवारी (दि.५) भोर गावच्या हद्दीत भोर ते महाड रस्त्याच्या डाव्या बाजूस संजय नगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर अजय किसन गोमाने याने स्वतःच्या फायद्याकरिता तयार वाळलेला उग्र वासाचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला असल्याचे मिळून आले. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार करीत आहेत.