Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:05 IST2025-09-05T15:04:44+5:302025-09-05T15:05:01+5:30
पुणे पोलिसांनी तयार केलेल्या कंट्रोल रूमद्वारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष असणार, तसेच लहान मुले, महिला मिसिंग झाल्यास या रूमद्वारे शोधण्यास मदत होणार
![Disciplined immersion procession; Use of AI technology, strict planning by Pune Police for security] | Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन Disciplined immersion procession; Use of AI technology, strict planning by Pune Police for security] | Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/anant-chaturadashi-pune-7_2025091537361.jpg)
Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन
पुणे : दोन गणेश मंडळांतील अंतर, मानाच्या गणरायांबरोबर असणारा मोठा लवाजमा, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप वेळ लागायचा. तासन् तास रेंगाळणाऱ्या विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षी यामुळे टीकादेखील होत असे. ही टीका टाळण्यासाठी पुणे शहर पोलिस दलाकडून यंदा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या गणेश मंडळांसह महत्त्वाच्या गणेश मंडळांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी वारंवार चर्चा करूनच हे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी दृष्टी इंटरग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर रूम तयार केली आहे. यात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उभारलेले हे कक्ष आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. AI टेक्नॉलॉजी चा वापर केला गेला आहे. याचा उपयोग विसर्जनादरम्यान गर्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळल्यास त्याचा अलर्ट कंट्रोल रूमला मिळेल.
गर्दीत लहान मुले, महिला मिसिंग झाल्यास त्याची देखील सूचना कंट्रोल रूमला दिल्यास त्या व्यक्ती शोधण्यास मदत होईल. बेलबाग चौक ते आलका चौका दरम्यान सर्वात अधिक मानाच्या गणपती पासून ते इतर मोठ्या मंडळाचे मिरवणूक मार्गस्थ होत असते. यादरम्यान मंडळांच्या मध्ये पडणारा गॅप तो भरून काढण्यासाठी कंट्रोल रूम मधून सूचना दिल्या जातील. असाच एक कंट्रोल रूम फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात तयार करण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींसाठी निश्चित केलेला वेळ..
गणपती मंडळ - लोकमान्य टिळक पुतळा, मंडई ते टिळक चौक (अलका टॉकिज चौक) - एकूण वेळ
कसबा गणपती - ०९:३० ते २:४५ - ५ तास १५ मिनिटे
तांबडी जोगेश्वरी - ०९:४५ ते ०३:०० - ५ तास १५ मिनिटे
गुरुजी तालीम - १०:०० ते ०३:३० - ५ तास ३० मिनिटे
तुळशीबाग - १०:१५ ते ०४:०० - ५ तास ४५ मिनिटे
केसरीवाडा - १०:०० ते ०४:०० - ०६:०० तास
दगडूशेठ हलवाई - (बेलबाग चौक) १६:०० ते १९:३० - ३ तास ३० मिनिटे
विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने
१) मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडला मार्गस्थ होईल. त्यानंतर ६व्या क्रमांकावर महापालिका गणपती मंडळ व ७व्या क्रमांकावर त्वेष्ठा कासार गणपती हे दुपारी १ वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ होतील.
२) त्यानंतर शिवाजी रोड, लक्ष्मी रोडवरील मंडळे बेलबाग चौकातून पावणे चार वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
३) दुपारी चार वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे बेलबाग चौकात आगमन होईल.
४) त्यानंतर रांगेतील मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
५) साडेपाच वाजेनंतर जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
६) सायंकाळी ७ वाजेनंतर विद्युत रोषणाईची मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.
७) मानाचे गणपती मिरवणुकीमध्ये टिळक पुतळा मंडई ते बेलबाग चौक दरम्यान कोणतेही ढोल-ताशा पथक वाद्य वाजविणार नाही. बेलबाग चौकापासून ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सामील होऊन वाद्य वाजवतील.
८) गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये मंडळासोबत डीजे अथवा ढोल-ताशा पथक यापैकी एकालाच परवानगी राहील.
९) कोणत्याही मंडळाचे ढोल-ताशा पथक हे स्थिर वादन करणार नाही.
१०) टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर कोणतेही मंडळ आपली मिरवणूक सकाळी साडेदहाच्या पूर्वी सुरू करणार नाही.