आई रागावली म्हणून मुलीची नदीत उडी मारून आत्महत्या; दौंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 21:10 IST2022-08-25T21:10:13+5:302022-08-25T21:10:26+5:30
मुलीचा मृतदेह अनगर (ता. श्रीगोंदा) या गावाच्या हद्दीत नदीकाठी सापडला

आई रागावली म्हणून मुलीची नदीत उडी मारून आत्महत्या; दौंडमधील घटना
दौंड : येथे एका अल्पवयीन मुलीने आई रागावली म्हणून भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. सोळा वर्षांच्या मुलीने दौंड-मनमाड लोहमार्ग रेल्वे पुलाजवळील नदीपात्राच्या कठड्यावरून दुपारच्या सुमारास भीमा नदीपात्रात उडी मारली.
यासंदर्भात मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ही मुलगी सापडली नाही. भीमा नदीपात्रात वाढलेले पाणी आणि पाण्याचा वाढता प्रभाव पाहता ही मुलगी वाहत वाहत दौंडपासून काही अंतरावर पुढे गेली. दरम्यान, आज दुपारी या मुलीचा मृतदेह अनगर (ता. श्रीगोंदा) या गावाच्या हद्दीत नदीकाठी सापडला. यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले.