Crime News: ब्लेडने वार करून गॅरेजवाल्याला लुटले; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:03 IST2021-12-30T17:00:24+5:302021-12-30T17:03:12+5:30
फिर्यादी शहा हे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते...

Crime News: ब्लेडने वार करून गॅरेजवाल्याला लुटले; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : पाच जणांनी गॅरेजवाल्यावर हल्ला केला. मारहाण तसेच ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. तसेच्या त्याच्याकडील एक लाख ४० हजार ३०० रुपयांचा माल जबरदस्तीने काढून नेला. आंबेडकर चौक, पिंपरी येथे मंगळवारी (दि. २८) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
फय्याज राशद शहा (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. फिर्यादी शहा हे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एका रिक्षात बसलेल्या पाच जणांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली.
त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या हातावर ब्लेड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर फिर्यादीकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख ४० हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.