पोलिस हवालदाराची कॉलर पकडून दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 20:20 IST2022-02-14T20:18:59+5:302022-02-14T20:20:00+5:30
कॉलर पकडून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

पोलिस हवालदाराची कॉलर पकडून दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
राजगुरूनगर: पोलीस आमच्या घरचे नोकर आहेत. तुमच्या सर्वाचा हिशोब चुकता करतो असा दम देऊन पोलिस हवालदाराची कॉलर पकडून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश मदन भोर ( वय२२ रा. वांजाळे ता. खेड, सध्या रा.शिरोली ता. खेड ) असे आरोपीचे नाव आहे. या बाबत पोलिस हवालदार निखिल कैलास मोरमारे यांनी फिर्याद दिली आहे.
वाडा ( ता.खेड ) येथील बार सागर शुभम येथे पोलीस हवालदार मोरमारे व होमगार्ड पेर्टोलिंग करत जात असताना दरम्यान तेथे तीन जणांमध्ये भांडणे सुरू होती. पोलीस हवालदार मोरमारे यांनी सांगितले की, भांडणे करु नका यांचा गणेश भोर याला राग येऊन मोरमारे यांच्या सरकारी गणवेशाचे कॉलरला धरुन तुम्ही कोण पोलीस आमचे घरचे तुम्ही नोकर आहेत. तुमचे सर्वाचा हिशोब चुक्ता करतो, असे म्हणून शिवीगाळ करुन मोरमारे यांच्या अंगाशी झटापट केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला.