"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:17 IST2026-01-07T19:16:02+5:302026-01-07T19:17:52+5:30

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत. 

"Ajit Pawar is the 'master' of corruption in Maharashtra, look at the his own son"; BJP MLA Ladge attacks, gets angry at Parth Pawar | "अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वबळावर लढत असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या घमासान सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापालिकांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि स्थानिक नेत्यांना घेरले. त्यामुळे भाजपाचे नेतेही अजित पवारांवर तुटून पडताना दिसत आहेत. अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे आमदार महेश लांडगे चांगलेच संतापले. अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत, असा घणाघात लांडगेंनी केला. 

अजित पवारांनी पिंपरी चिंचवड येथील सभेत बोलताना भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम बघा. ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत. मूळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत", अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली. 

पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, अशी टीका अजित पवारांनी सभेत बोलताना केली होती. त्यावर महेश लांडगे म्हणाले, "सध्या अजित पवार यांचा अहंकार बोलत आहे. ते नैराश्यात आहेत."

"...म्हणून अजित पवार भाजपासोबत आले"  

अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार भाजपासोबत आले आहेत. अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत."

"मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पहा. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील, तर मी महापालिका प्रशासन आणि अजित पवार समोरासमोर यावं. मग सर्व उत्तरे मिळतील", असा पलटवार महेश लांडगेंनी केला. 

Web Title : अजित पवार महाराष्ट्र में भ्रष्टाचार के 'सरगना': भाजपा विधायक का हमला

Web Summary : भाजपा विधायक महेश लांडगे ने अजित पवार पर महाराष्ट्र में भ्रष्टाचार का 'सरगना' होने का आरोप लगाया। लांडगे ने पवार के भ्रष्टाचार के आरोपों का जवाब उनके बेटे पार्थ पवार का जिक्र करके दिया।

Web Title : Ajit Pawar is corruption's 'kingpin' in Maharashtra: BJP MLA attacks.

Web Summary : BJP MLA Mahesh Landge accuses Ajit Pawar of being Maharashtra's 'kingpin' of corruption. Landge retorted to Pawar's accusations of corruption by bringing up his son, Parth Pawar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.