"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 21:03 IST2022-09-14T21:02:30+5:302022-09-14T21:03:56+5:30

आकर्षक फुलांची केलेली आरास आणि 129 दिव्यांनी शारदा गजाननाला औक्षण करीत अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 129 वा वाढदिवस उत्साहात साजरा

Aapla Ganapati Sharda Ganapati Akhil Mandai Mandal birthday celebration of Ganapati with enthusiasm | "आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे : शारदा-गजाननाच्या मूर्तीला परिधान केलेली भरजरी वस्त्रे अन्‌ फुलांचे हार... ढोल ताशांचा निनाद...गणपती बाप्पा मोरयाचा गजर...आकर्षक फुलांची केलेली आरास आणि 129 दिव्यांनी शारदा गजाननाला औक्षण करीत अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 129 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शारदा गजाननाची देखणी मूर्ती कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांची यावेळी झुंबड उडाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते 129 किलोचा मोदक आकारातील केक कापण्यात आला. यावेळी हेमंत रासने, सुनील रासने, नगरसेवक सम्राट थोरात, पराग एरंडे, जयंत केदार, डाॅ. मंदार अंबिके, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोशाध्यक्ष संजय मते, विश्वास भोर, सूरज थोरात उपस्थित होते.

Web Title: Aapla Ganapati Sharda Ganapati Akhil Mandai Mandal birthday celebration of Ganapati with enthusiasm