'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:22 AM2019-04-14T00:22:14+5:302019-04-14T00:24:31+5:30

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही,

Songs in the constituency did not work in any public utility ' | 'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

Next

अलिबाग : सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे विकासावर बोलण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्याचमुळे ते जाहीर सभेत लोटांगण घालून माझ्यावर टीका करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील जाहीर सभेत केला.
तालुक्यातील थळ, मापगाव, शहापूर आणि कुर्डूस येथील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडीतील घटक पक्ष असणाºया काँग्रेसने त्यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम आखला होता. त्यांनी या ठिकाणी प्रचार रॅली आणि झंझावती सभा घेतल्या. त्या सभांमधून तटकरे यांनी भाजप सरकार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने देशात काय केले, असा अपप्रचार भाजप आणि शिवसेना करत आहे. याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, विविध कंपन्या, शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य आयात करणारा अशी ओळख पुसून तो निर्यात करणारा देश अशी केली. संगणक, मोबाइल हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घेतलेले निर्णय आहेत. भाजप सरकारेन जनतेला फसवण्याचे काम केले आहे.


देशाला आज धर्मनिरपेक्ष विचारांची आणि सरकाची गरज आहे. देशात परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप सरकाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला नाही, त्यांच्या मालाला आधारभूत किंमत त्यांना देता आलेली नाही. पीक विम्यात भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

युतीचे उमेदवार गीते यांनी रायगड मतदारसंघात विकास केलेला नाही. दिवेआगर, मुरुड, माणगाव, गोरेगाव या ठिकाणी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड घेऊन तेथे फक्त सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम केले. मी आणलेला विकासनिधी त्यांनी आणल्याचे खोटे सांगण्याचा ‘उद्योग’ अवजड उद्योगमंत्र्यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गीतेंनी केलेली कामे मी दुर्बीण लावून शोधत असल्याची मार्मिक टीकाही त्यांनी केली.
अवजड उद्योगमंत्री म्हणून काँग्रेसचे तत्कालीन दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर येथे तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणून तेथे कंपनी उभारली, तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गोंदियामध्ये कंपनी उभारून हजोरो बेराजगार तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र, गीते यांना ती किमया साधता आली नाही. त्यांनी फक्त रेल्वे आणण्याचे आणि रोहे आणि रत्नागिरी येथे पेपर इंडस्ट्री आणण्याच्या फक्त घोषणाच केल्या. आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेले नाहीत, असे असतानाही ते त्याच प्रकल्पग्रस्तांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मते मागत असल्याची टीका तटकरे यांनी
केली.
१९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोटकंट्रोल असल्याने भाजप त्यांचे ऐकत होती, आता मात्र चित्र उलटे झाले आहे. शिवसेना भाजप सोबत फरफरटत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली, तर मोंदीना चौकीदार चोर आहे, असे संबोधल्याची आठवण त्यांनी करून दिली. भाजप सरकारच्या कालावधीत महिला, दलित यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. बेरोजगारांचा प्रश्न आकाशाला भिडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग, रेवस-रेड्डी सागरी मार्ग पूर्ण करण्याबाबत मंत्री असताना दिलेला शब्द खरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, सुनील थळे, राजा ठाकूर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Songs in the constituency did not work in any public utility '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.