राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आघाडी - आदित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:54 IST2019-04-19T05:53:59+5:302019-04-19T05:54:31+5:30

महाराष्ट्रात एकीकडे भाजप-शिवसेनेची महायुती पक्की आहे.

 NCP is the corrupt Congress front - Aditya | राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आघाडी - आदित्य

राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आघाडी - आदित्य

कोपरगाव (जि.अहमदनगर) : महाराष्ट्रात एकीकडे भाजप-शिवसेनेची महायुती पक्की आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेसची आघाडी आहे, अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत गुरुवारी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, सर्वत्र भगवी लाट आहे. महायुतीसमोर कुठलेही चिन्ह उभे नाही. केंद्रात पंतप्रधान मोदी यांचेच सरकार पुन्हा येणार आहे. काँग्रेसने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र यात भांडणे लावली. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देश कार्टून नेटवर्क होईल. ते म्हणतात, आमचे सरकार आल्यास ३७० कलम ठेवू. पण ते ठेवले तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत राहतील.

Web Title:  NCP is the corrupt Congress front - Aditya