VIDEO: भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; 'मोदी-मोदी'च्या घोषणांना 'चोर है'नं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:23 IST2019-04-18T20:21:29+5:302019-04-18T20:23:54+5:30

वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

lok sabha election bjp and ncp workers chants slogans in news channels program in jalgaon | VIDEO: भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; 'मोदी-मोदी'च्या घोषणांना 'चोर है'नं प्रत्युत्तर

VIDEO: भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; 'मोदी-मोदी'च्या घोषणांना 'चोर है'नं प्रत्युत्तर

जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीनं आयोजित करण्यात आलेल्या ‘आमने-सामने’ या कार्यक्रमात युती आणि आघाडीच्या समर्थकांनी मोदी -मोदी आणि चौकीदार चोर है... अशा घोषणा दिल्याने वातावरण तापले होते. शेवटी वाद वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. 

जळगावच्या रोटरी भवनात झालेल्या या कार्यक्रमासाठी भाजप - सेना युतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादीकडून चोर है चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. काही मिनिटं ही घोषणाबाजी सुरू होती. यावेळी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही बराच वेळ ही घोषणाबाजी सुरुच होती.
 

Web Title: lok sabha election bjp and ncp workers chants slogans in news channels program in jalgaon