'तू घटस्फोट दे मी तु्झ्याशी लग्न करेन', असं सागून त्याने वारंवार केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:19 IST2021-10-08T16:02:11+5:302021-10-08T16:19:43+5:30

मित्राच्या बायकोसोबत सुरवातीला मैत्री करून आणि नंतर प्रेमसंबंध ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला

showing lure of marriage woman raped by husband friend crime news | 'तू घटस्फोट दे मी तु्झ्याशी लग्न करेन', असं सागून त्याने वारंवार केला बलात्कार

'तू घटस्फोट दे मी तु्झ्याशी लग्न करेन', असं सागून त्याने वारंवार केला बलात्कार

पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवत मित्राला घटस्फोट देण्यास सांगत मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मित्राच्या बायकोसोबत सुरवातीला मैत्री करून आणि नंतर प्रेमसंबंध ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर नवऱ्याला सोडून दे, मग आपण लग्न करू, असे सांगितले. मात्र, पिडीतेने नवऱ्याला प्रेमप्रकऱणाबाबत सांगितल्यावर मित्राने लग्नाला नकार देत पिडीतेची फसवणूक केली. ऑगस्ट २०२० ते सात ऑक्टोबपर्यंत फिर्यादी यांचे राहते घर आणि डुडुळगाव येथे वेळोवेळी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय पिडीतेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजीत राजेंद्र क्षीरसागर (रा. टिंगरेनगर, गल्ली नंबर एक) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्षीरसागर हा पिडीत महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपीने सुरूवातीला पिडीत महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. ऑगस्ट २०२० मध्ये आरोपी फिर्यादी यांच्या घराबाहेर येऊन फिर्यादी यांना भेटायला बोलवले. तसेच बाहेर फिरायला जाऊ असे म्हणत फिर्यादी यांना डुडुळगाव येथील एका लॉजवर घेऊन गेला. तेथे गेल्यावर, तु तुझ्या नवऱ्याला सोड, त्याच्याकडून घटस्फोट घे, तुझा नवरा काही कामाचा नाही, मी त्याला चांगला ओळखतो, तुझा घटस्फोट ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करतो, असे अमिष आरोपीने फिर्यादी यांना दाखविले.

मात्र, फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता आरोपीने जबरदस्तीने फिर्यादी यांच्याशी शरिरसंबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगितले. मात्र, आरोपीने तू तुझ्या नवऱ्याला आपले प्रेमसंबंध सांगून टाक, घटस्फोट घे, मग आपण लग्न करू, असे सांगितले. आरोपीवर विश्वास ठेऊन ऑगस्ट २०२१ मध्ये फिर्यादी यांनी पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे फिर्यादी यांचा पती फिर्यादी यांना घटस्फोट देण्यास तयार झाला. त्यानंतर फिर्यादी यांना आरोपीला फोन करून सांगितले. मात्र, तेंव्हा आरोपीने लग्नास नकार देत फिर्यादी यांची फसवणूक केली.

 

Web Title: showing lure of marriage woman raped by husband friend crime news