संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 23, 2024 10:36 IST2024-04-23T10:34:16+5:302024-04-23T10:36:30+5:30

पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत....

Sanjog Waghere leaves to file candidature, rally starts from Pimpri maval lok sabha | संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे-पाटील उमेदवारी अर्ज आज मंगळवारी (दि.२३) दाखल करत आहेत. पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. 

रॅलीला सुरुवात झाली असून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचणार आहे. खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप होईल. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा होणार आहे. 

आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, रोहित पवारांची उपस्थिती...

अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार जयंत पाटील, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sanjog Waghere leaves to file candidature, rally starts from Pimpri maval lok sabha