PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:31 IST2025-11-10T17:30:49+5:302025-11-10T17:31:19+5:30
- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे.

PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज होणार
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतरच कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार? याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे.
१६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी आणि त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे. तसेच एक आरक्षण असलेल्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने ते आरक्षण असणार आहे.