भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळेंची निवड; महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:14 IST2026-02-01T15:14:28+5:302026-02-01T15:14:41+5:30

- महापालिका निवडणुकीआधीच केला होता पक्षप्रवेश : तिढा कायम; चिंचवड, पिंपरी, भोसरी विधानसभा मतदारसंघात चुरस; महापौरपदासाठी उद्या होणार अर्ज दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Prashant Shitole elected as BJP group leader; Who will be the mayor, standing committee chairman? | भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळेंची निवड; महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला?

भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळेंची निवड; महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला?

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहे. मात्र, महापौरपदाचा तिढा कायम असल्याने उत्सुकता वाढली आहे.

महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाने शनिवारी (दि.३१) विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे. गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शितोळे हेच सभागृह नेते असणार आहेत. भाजपचा गट नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

शितोळे चौथ्यांदा सभागृहात

प्रशांत शितोळे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ३२ सांगवी गावठाणमधून चारवेळा निवडून आले आहेत. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. ते आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय आहेत.

महापौरपद चिंचवडला, तर स्थायी समिती अध्यक्षपद भोसरी मतदारसंघाकडे?

गटनेता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील झाल्यानंतर आता महापौरपदाची चुरस वाढली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, रवी लांडगे, नितीन लांडगे महापौरपदासाठी इच्छुक आहेत. चिंचवड मतदारसंघातील शत्रुघ्न काटे आणि राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरी मतदारसंघाकडे राहण्याची शक्यता आहे.

भोसरी-पिंपरीची ताकद कमी?

गटनेतेपद जाहीर होताच आता पुढील पदांबाबत चर्चा तीव्र झाली आहे. विशेषतः महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी पिंपरी आणि भोसरी मतदारसंघांतील नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकीकडे संघटनेत सातत्याने काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे राजकीय गणिते आणि नेतृत्वाच्या पसंतीला अधिक महत्त्व दिले जात आहे. 

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार?

महापालिकेतील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा गटनेता निवडण्यासाठी अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची मंगळवारी बैठक झाली होती. यामध्ये तीन ते चार नावांवर चर्चा झाली होती. गटनेता निवडण्याचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव झाला होता. पाटील यांच्यामार्फत नावे दिली जाणार होती. परंतु, बुधवारी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विचारून गटनेता निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादीचा गटनेता महापालिकेतील विरोधी पक्षनेता असणार आहे. यासाठी संदीप वाघेरे, भाऊसाहेब भोईर, वैशाली घोडेकर इच्छुक आहेत. 

Web Title : प्रशांत शितोले बीजेपी समूह नेता; महापौर, स्थायी समिति पद फोकस में

Web Summary : प्रशांत शितोले पिंपरी-चिंचवड में भाजपा के समूह नेता हैं। महापौर और स्थायी समिति के प्रमुख पद अब महत्वपूर्ण हैं। चिंचवड से महापौर के लिए प्रतिस्पर्धा बढ़ रही है, जबकि स्थायी समिति के अध्यक्ष पद की संभावना भोसरी को मिलने की है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हाल की घटनाओं के बाद नेता चयन का इंतजार कर रही है।

Web Title : Prashant Shitole BJP Group Leader; Mayor, Standing Committee Posts in Focus

Web Summary : Prashant Shitole is BJP's group leader in Pimpri-Chinchwad. Mayor and standing committee head positions are now key. Competition rises for mayor from Chinchwad, while standing committee chair likely goes to Bhosari. Nationalist Congress Party awaits leader selection after recent events.