PCMC Election Results 2026 :नगरसेवकांची ‘इयत्ता’ कोणती? महापालिका सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:27 IST2026-01-18T17:26:24+5:302026-01-18T17:27:53+5:30

​​​​​​​लोकमत विश्लेषण: पदवीधर ३३, तर पदव्युत्तर पदवी घेतलेले आठ जण; दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४८

PCMC Election Results 2026 One doctor, three lawyers, five engineers and three teachers in the municipal hall | PCMC Election Results 2026 :नगरसेवकांची ‘इयत्ता’ कोणती? महापालिका सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षक

PCMC Election Results 2026 :नगरसेवकांची ‘इयत्ता’ कोणती? महापालिका सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षक

- प्रशांत होनमाने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सूत्रे नव्या १२८ नगरसेवकांच्या हाती आली आहेत. यामध्ये चौथी ते सातवीपर्यंत शिकलेले १४, तर आठवी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले १८ नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले नगरसेवक सर्वाधिक असून त्यांची संख्या ४८ आहे.

उच्चशिक्षण घेतलेल्या नगरसेवकांचाही सभागृहात लक्षणीय सहभाग आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवीधर नगरसेवकांची संख्या ३३ आहे. याशिवाय, एमए, एमकॉम, एमएस्सी, एमबीए, एमसीएसारखी पदव्युत्तर पदवी घेतलेले आठ नगरसेवक निवडून आले आहेत.

महापालिकेच्या सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षक अशा व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय आहे. नव्या सभागृहात एक डॉक्टर, तीन वकील, पाच अभियंते, आणि तीन शिक्षक आहेत. त्यामुळे आरोग्य, कायदा, शिक्षण आणि विकासकामांबाबत उच्चशिक्षितांकडून तज्ज्ञ मत मांडले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच चौथी पासपासून पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांचा समावेश असलेले हे सभागृह लोकशाहीतील व्यापक प्रतिनिधित्वाचे चित्र उभे करत आहे. विशेष म्हणजे दहावीपासून पदवीधर नगरसेवकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८१ आहे.

------------------

महापालिका निवडणूक : नगरसेवकांचे शैक्षणिक चित्र

एकूण नगरसेवक : १२८

शैक्षणिक पात्रता संख्या

४ थी ते ७ वी : १४

८ वी ते ९ वी : १८

१० वी पास : २७

१२ वी पास : २१

पदवीधर (बीए/ बीकॉम/ बीएस्सी) : ३३

पदव्युत्तर (एमए/ एमकॉम/ एमएससी/ एमबीए/ एमसीए) : ८

व्यावसायिक पदवी (डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक) : ७

दहावी ते पदवीधर नगरसेवकांची संख्या सर्वाधिक (८१)

Web Title : PCMC चुनाव 2026: पार्षदों की शिक्षा का स्तर - एक विविध सदन

Web Summary : PCMC के नए पार्षदों की शिक्षा प्राथमिक से स्नातकोत्तर तक विविध है। बड़ी संख्या में डिग्री धारक हैं। सदन में डॉक्टर, वकील, इंजीनियर और शिक्षक भी शामिल हैं, जो प्रमुख मुद्दों पर विशेषज्ञ राय का वादा करते हैं।

Web Title : PCMC Election 2026: Corporators' Education Levels - A Diverse House

Web Summary : PCMC's new corporators boast varied education, from primary school to postgraduate degrees. A significant number hold degrees. The house also includes doctors, lawyers, engineers, and teachers, promising expert perspectives on key issues.