PCMC Election 2026 : विकासाची निवडणूक हाती घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:55 IST2026-01-10T10:55:17+5:302026-01-10T10:55:43+5:30
भाजपच्या माध्यमातून आणलेली लाडकी बहीण योजना समाजाच्या सर्व घटकांवर दूरगामी परिणाम करणारी ठरली, असे मत पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

PCMC Election 2026 : विकासाची निवडणूक हाती घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – पंकजा मुंडे
पिंपरी : भाजपने महिला भगिनींचा सन्मान करणारे स्त्री शक्तीयुग आणले, म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या विकासाची ही निवडणूक हाती घ्यायची आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडायचे नाही. भाजपच्या माध्यमातून आणलेली लाडकी बहीण योजना समाजाच्या सर्व घटकांवर दूरगामी परिणाम करणारी ठरली, असे मत पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली. यावेळी आमदार शंकर जगताप, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहराने कायम विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
भाजपने कधीच जातीवादी, धर्मवादी भूमिका स्वीकारली नाही. गरिबांचे अश्रू पुसताना कोणताही रंग, कपडे याचे प्रमाण मानले नाही. कोणतीही योजना रंग पाहून राबविली नाही, तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण ठेवली. गरिबीच्या रंगातून बाहेर पडून संपन्नतेचा रंग प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला आहे.