PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:13 IST2025-12-31T11:12:27+5:302025-12-31T11:13:25+5:30
PCMC Election 2026 पूर्ण ताकदीने स्वबळावर लढण्यासाठी पक्षसंघटनेने तयारी करणे आवश्यक असताना काँग्रेसला निम्म्या जागांवरही उमेदवार देता आले नाहीत

PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा
पिंपरी : काँग्रेसतर्फे ५८ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत या निवडणुकीसाठी आघाडी झालेली नाही. त्यामुळे ‘एकला चलो रे’ म्हणत काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.
प्रभाग १ ड - आकाश शिंदे, प्रभाग २ क - जुनेद चौधरी, प्रभाग ३ अ - गौरी नरसिंगे, प्रभाग ४ अ - अंजली सरोदे, प्रभाग ५ ड - हरीश डोळस, प्रभाग ६ अ - इंदुबाई घनवट, प्रभाग ८ अ - अमित कांबळे, क - प्राजक्ता पाटील, ड - प्रकाश झा, प्रभाग ९ अ - ॲड. उमेश खंदारे, ब - समरीन कुरेशी, क - डॉ. मनीषा गरुड, ड - अशोक धायगुडे, प्रभाग १० अ - रमा भोसले, ड - जितेंद्र छाबडा, प्रभाग ११ अ - सुरेश जाधव, ब - सुभद्रा ठोंबरे, क - गंगा धेंडे, ड - गणेश भांडवलकर, प्रभाग १२ अ - गोरखनाथ लोहार, ब - आसिफा तांबोळी, ड - शौकत अली शेख नूर शेख, प्रभाग १३ अ - सुरज गायकवाड, क - वैशाली पवार, ड - विलास सकट, प्रभाग १४ ड - मकरध्वज यादव, प्रभाग १५ अ - संदेश जगताप, ब - शुभांगी शिंदे, ड - हर्षवर्धन पांढरकर, प्रभाग १६ अ - अर्चना राऊत, ब - प्रियंका गोजगे, क - सविता भोंडवे, ड - मजहर शेर मोहम्मद खान, प्रभाग १७ अ - विजया मानमोडे, ब - तुषार पाटील, क - सुप्रिया वाल्हेकर, ड - माधव पाटील, प्रभाग १८ ब - भाग्यश्री भोईर, प्रभाग १९ अ - महानंदा कसबे, ब - रोहित भाट, ड - दीपक श्रीवास्तव, प्रभाग २० अ - ॲड. किरण खाजेकर, ब - स्वीटी मलादपुरे, ड - राजन पिल्ले, प्रभाग २२ ब - सायली नढे, क - ज्ञानेश्वर मलशेट्टी, ड - रवी नांगरे, प्रभाग २३ अ - सरोज कुचेकर, ड - धनाजी येळकर पाटील, प्रभाग २५ अ - स्वप्नील बनसोडे, ब - अंकिता भूमकर, क - प्रफुला मोतलिंग, प्रभाग २८ अ - विशाल जाधव, प्रभाग ३० अ - सार्थक बाराथे, ब - दुर्गा ठोकळ, ड - जन्नत सय्यद, प्रभाग ३१ अ - सुरेखा बनसोडे, प्रभाग ३२ ड - मिलिंद फडतरे या उमेदवारांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे.
निम्म्या जागांवरही देता आले नाहीत उमेदवार
काँग्रेस पक्षाची शहरात झालेली वाताहत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिक जाणवली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत आघाडी होणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे पूर्ण ताकदीने स्वबळावर लढण्यासाठी पक्षसंघटनेने तयारी करणे आवश्यक होते. मात्र, एकूण ३२ प्रभागांतील १२८ पैकी केवळ ५८ जागांवर उमेदवार देण्यात आले. निम्म्या जागांवरही पक्षाला उमेदवार देता आले नाहीत.