शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 23, 2024 04:29 PM2024-04-23T16:29:02+5:302024-04-23T16:30:19+5:30

अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी प्रमुख नेते उपस्थित

In a show of strength the candidate of mahavikas aghadi Sanjog Waghere filed his candidature for Maval Lok Sabha constituency | शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी : जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज(दि.२३ एप्रिल) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरीगाव येथून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात झाली. पुढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचली. खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास वाघेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

Web Title: In a show of strength the candidate of mahavikas aghadi Sanjog Waghere filed his candidature for Maval Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.