चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ शॉर्टसर्किटमुळे पाच दुकाने जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:01 IST2022-03-05T15:58:44+5:302022-03-05T16:01:27+5:30
चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार ते पाच दुकांनाना अचानक आग...

चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ शॉर्टसर्किटमुळे पाच दुकाने जळून खाक
पिंपरी :चिंचवडरेल्वे स्टेशन जवळील पाच दुकानांना आग लागली. पत्राशेडची असलेली ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या चार बंबानी आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडरेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार ते पाच दुकांनाना अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. १.४५ वाजता चार बंब घटनास्थळी दाखल झाले. यात वल्लभनगर अग्निशमन दलातील २ बंब, निगडी प्राधिकरणातील १ बंब तर चिखलीतील १ बंब घटनास्थळी पोहचले.
तासाभरात आग आटोक्यात आली. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ५०-६० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.