Pune : भोसरी पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:51 IST2022-12-08T10:49:53+5:302022-12-08T10:51:13+5:30

याप्रकरणी प्रेयसीसह तिची आई व भावावर गुन्हा दाखल...

Death of a young man who was set on fire in Bhosari police station | Pune : भोसरी पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

Pune : भोसरी पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

पिंपरी : तरुणीने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याने प्रियकराने पोलिस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतले. ही घटना २ डिसेंबरच्या रात्री भोसरी पोलिस ठाणे येथे घडली. तरुणाचा उपचारादरम्यान ५ डिसेंबरला मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेयसीसह तिची आई व भावावर गुन्हा दाखल केला आहे.

बालाजी कल्याण शेडापे (वय २४, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे वडील कल्याण शेडापे (वय ५६) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात याविषयीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालाजी याचे १९ वर्षीय आरोपी मुलीशी प्रेमसंबंध होते. आत्तापर्यंत शिक्षण व इतर खर्चासाठी त्याने तिच्यावर सव्वादोन लाख रुपये खर्च केले होते.

मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्यात खटके उडाल्याने संबंधित मुलीने लग्नास नकार दिला. तसेच आरोपींनी आपापसात संगनमत करून बालाजीच्या विरोधात बलात्कार व छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल केला. या त्रासाला कंटाळून बालाजीने २ डिसेंबरच्या रात्री पोलिस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतले. दरम्यान, सोमवारी (दि. ५) रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Death of a young man who was set on fire in Bhosari police station