‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 18, 2024 03:52 PM2024-04-18T15:52:12+5:302024-04-18T15:54:41+5:30

निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून यावर्षीचा मावळचा खासदार चिंचवड आणि पनवेलकर ठरविणार आहेत....

Chinchwad and Panvelkar will decide 'Mavalcha' privates; 11 lakh 61 thousand voters in both constituencies | ‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार

‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार

पिंपरी :मावळ मतदारसंघातील चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८ तर पनवेलमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५ या दोन्ही मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार ३२३ मतदार आहेत. निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून यावर्षीचा मावळचा खासदार चिंचवड आणि पनवेलकर ठरविणार आहेत.

पिंपरीत तीन लाख ६४ हजार ८०६, मावळमध्ये तीन लाख ६९ हजार ५३४, कर्जत तीन लाख चार ५२३ आणि उरणमध्ये तीन लाख नऊ हजार २७५ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील १३ लाख २९ हजार ७४८ तर पनवेल, कर्जत, उरणमधील ११ लाख ७९ हजार ७१३ मतदार आहेत. यात पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख ५० हजार जास्त मतदार आहेत.

पावणेतीन लाख मतदार वाढले -

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत दोन लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.

बाराशे मतदान केंद्रावर होणार वेबकास्टिंग -

दोन हजार ५६२ मतदान केंद्र आहेत. त्यात शहरी एक हजार ६९१ तर ग्रामीण भागात ८७१ केंद्र आहेत. तीन हजार ५९४ मतदान यंत्र तर तीन हजार ८१९ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. मतदानाच्या दिवशी एक हजार २८१ पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येणार आहे.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आचारसंहिता भंगाच्या ५० तक्रारी निकाली काढल्या आहेत. मतदारांना उन्हात उभे राहू लागू नये यासाठी मंडप टाकण्यात येणार आहे. पाण्याची सोय केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान केंद्रात घेतले जाईल. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.

- दीपक सिंगला, निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ लोकसभा

Web Title: Chinchwad and Panvelkar will decide 'Mavalcha' privates; 11 lakh 61 thousand voters in both constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.