Pune Crime | वाहनात ठेवली कुऱ्हाड, माजी नगरसेविकेच्या मुलावर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 21:41 IST2023-02-10T21:40:00+5:302023-02-10T21:41:37+5:30
ही घटना शुक्रवारी (दि.१०) चिंचवड पोलीस ठाण्यात हद्दीत घडली...

Pune Crime | वाहनात ठेवली कुऱ्हाड, माजी नगरसेविकेच्या मुलावर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा
चिंचवड : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असताना माजी नगरसेविकेच्या मुलाच्या गाडीत कुऱ्हाड मिळून आली. ही घटना शुक्रवारी (दि.१०) चिंचवड पोलीस ठाण्यात हद्दीत घडली. या प्रकरणी रोहित वसंत गावडे (रा. चिंचवड) यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवीनगर चेकपोस्ट वर वाहनांची तपासणी करतावेळी एका चारचाकी वाहनातून एक कुऱ्हाड एका चारचाकी वाहनात मिळून आली. याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळालेल्याने संबंधित वाहनचालकाला चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले तसेच विनापरवाना घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित वसंत गावडे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. माजी नगरसेविका जयश्री गावडे याचा तो मुलगा आहे. गाडीत कुऱ्हाड का व कशासाठी ठेवली, याचा तपास चिंचवड पोलिस करत आहेत.