Pune : क्लासला चाललेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मारली मिठी; आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 20:50 IST2022-10-19T20:46:59+5:302022-10-19T20:50:01+5:30
हा प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास रिव्हर रोड, पिंपरी येथे घडला...

Pune : क्लासला चाललेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मारली मिठी; आरोपी ताब्यात
पिंपरी : क्लासला चाललेल्या अल्पवयीन मुलीचा रस्त्याच्या बाजूला ओढत नेत मनात लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. १८) रात्री साडेदहाच्या सुमारास रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लखनलाल विंद्रावत (वय ४५, रा. पिंपरी,मूळ गाव- मौदहा,उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी एकटी क्लासला जात असताना कराची चौकाकडून दुचाकीवरून आरोपी आणि त्याच्यासोबत आणखी एकजण आला. आरोपी दुचाकीवरून उतरून त्याने फिर्यादीला मी तुला ओळखतो असते म्हणत जबरदस्तीने मिठी मारून हाताला पकडून रस्त्याच्या बाजूला बोळीत नेले.
फिर्यादीने आरडाओरडा केल्याने फिर्यादीचे चुलते तसेच इतर तेथे आले. त्यांनी फिर्यादीला आरोपीच्या तावडीतून सोडवून आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर दुचाकीवरील दुसरा आरोपी पळून गेला.