१० दिवस उत्तम टिकणाऱ्या स्वादिष्ट खिरापतीची खास रेसिपी- खिरापत खाऊन सगळेच होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 14:49 IST2025-08-26T14:08:33+5:302025-08-26T14:49:38+5:30

गणपती उत्सवात मोदकासह आणखी एका पदार्थाला खूप मान असतो आणि तो पदार्थ म्हणजे खिरापत.(how to make khirapat for Ganpati festival?)

खिरापतीचा नैवेद्य कसा तयार करायचा आणि तो चवदार होण्यासाठी काय काळजी घ्यायची ते पाहूया..(simple recipe of making khirapat)

खिरापत करण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी खोबऱ्याचा किस घ्या आणि तो कढईमध्ये घालून मंद आचेवर भाजून घ्या.(kirapat naivedya recipe in Marathi)

त्यानंतर गरम कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घाला आणि त्यामध्ये बारीक चिरलेले सुकामेव्याचे काप हलकेसे परतून घ्या. बदाम, काजू, पिस्ता, बेदाणे असा सुकामेवा तुम्ही घेऊ शकता.

यानंतर परतून घेतलेला सुकामेवा आणि खोबरे जेव्हा थंड होईल तेव्हा त्यामध्ये अर्धी वाटी पिठीसाखर घाला.

याच मिश्रणात थोडी वेलची पावडर घाला. खिरापतीला अतिशय छान स्वाद येतो. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या.

काही ठिकाणी खिरापतीमध्ये खसखस घातली जाते. जर तुम्हाला घालायची असेल तर ती हलकीशी भाजून घ्या. आणि वर सांगितलेल्या मिश्रणामध्ये घाला.

१० दिवस अगदी उत्तम टिकणारी खिरापत झाली तयार. ही खिरापत चवीलाही खूप उत्तम लागते.