Photos: यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवात पुण्यातील मंडळांचे नयनरम्य देखावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 18:22 IST2022-09-04T17:35:39+5:302022-09-04T18:22:15+5:30
हलते अन् जिवंत देखावे, महल, विद्युत रोषणाई अशा गणेशमय वातावरणांत पुण्यातील गणेशोत्सव सुरु झाला आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवात केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, हंपी रथ, फुलांच्या सजावटीने तयार केलेले महल, ऐतिहासिक जिवंत आणि हलते देखावे मंडळांनी साकारले आहेत. अनेक मंडळांनी समाजप्रबोधनात्मक विषयावर भर दिला आहे. तर काहींनी काल्पनिक रथ तयार केले आहेत. रथ, महल, आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. अशाच देखाव्यांची पुणे शहरातील आकर्षक छायाचित्रे.

साईनाथ मंडळ, देखावा - स्वातंत्र्याचा तेजस्वी महानायक
श्री सत्यशोधक मारुती मंडळ, देखावा - दिव्यांचा रथ
प्रभात प्रतिष्ठान , देखावा - काल्पनिक महल
नवनाथ तरुण मंडळ, देखावा - आझादी का अमृत महोत्सव
नवग्रह मंडळ, देखावा - केदारनाथ मंदिर
जनार्दन पवळे संघ, देखावा - हंपी रथ
गणेश मित्र मंडळ, देखावा - पावनखिंड
मुंजोबाचा बोळ तरुण मंडळ, देखावा - कालिकामाता
छत्रपती संभाजी मंडळ, देखावा - शिवराज्याभिषेक
चक्रवर्ती अशोक मंडळ, देखावा - सूर्यमंदिर