महाराष्ट्राने आतापर्यंत किती महिलांना केले खासदार? २०१९ मध्ये रचला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:54 PM2024-04-20T12:54:08+5:302024-04-20T13:09:27+5:30

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रातूनही प्रथमच २०१९ मध्ये एवढ्या प्रमाणात महिला खासदार निवडून आल्या.

आतापर्यंत झालेल्या १७ सार्वत्रिक निवडणुकांपैकी, शेवटच्या म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक ७८ महिला खासदार निवडून आल्या.

२०१९ मध्ये निवडून आलेल्या महिला खासदारांपैकी महाराष्ट्रातील आठ महिला खासदारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातूनही प्रथमच २०१९ मध्ये एवढ्या प्रमाणात महिला खासदार निवडून आल्या.

(१) - नंदुरबार हिना गावित (भाजप) ६३९१३६, (२) - अमरावती नवनीत कौर राणा (अपक्ष) ५१०९४७, (३) - रावेर रक्षा खडसे (भाजप) ६५५३८६, (४) - बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) ६८६७१४

(५) - यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) ५४२०९८, (६) - दिंडोरी भारती पवार (भाजप) ५६७४७०, (७) - मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) ४८६६७२, (८) - बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) ६७८१७५

१९५२-५७ - ४ खासदार, १९५७-६२ - ३ खासदार, १९६२-६७ - ३ खासदार, १९६७-७० - ३ खासदार, १९७१-७७ - २ खासदार, १९७७-७९ - ३ खासदार.

१९८०-८४ - ४ खासदार, १९८४-८९ - ३ खासदार, १९८०-९१ - २ खासदार, १९९१-९६ - ३ खासदार, १९९६-९७ - २ खासदार, १९९८-९९ - २ खासदार.

१९९९-०४ - ४ खासदार, २००४-०९ - ६ खासदार, २००९-१४ - ३ खासदार, २०१४-१९ - ६ खासदार, २०१९-२४ - ८ खासदार.

मागील लोकसभा निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्रातून ८ महिला खासदार निवडून आल्या. यामध्ये भाजपच्या (५), राष्ट्रवादीची (१), शिवसेनेची (१) आणि एक अपक्ष महिला खासदार विजयी झाली.

देशात आणि राज्यात निवडून आलेल्या महिला खासदार