MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग?

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नातं अनेकदा जोडलं गेलं आहे. अगदी रवी शास्त्री-अमृता सिन्हा ते विराट कोहली-अनुष्का शर्मापर्यंत बॉलिवूड-क्रिकेट नातं फुलत गेलं. काही नाती यशस्वी झाली, तर काही चर्चेपुरतीच मर्यादित राहिली.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या अफेअर्सची चर्चा रंगल्या होत्या. पण, हे अफेअर चर्चांपूरतेच मर्यादित राहिलं.

बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर धोनीचं प्रेम होतं. पण, मित्र युवराज सिंगसाठी त्यानं प्रेमाचा त्याग केला.

बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रीबाबत जाणून घेण्यासाठी धोनीनं दिग्दर्शक फराह खान ते शाहरुख खान यांच्याकडे चौकशीही केली होती. इतकंच नव्हे तर तिच्याशी भेट घडवून आणण्याची विनंतीही किंग खानकडे केली होती.

2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजयानंतरची ही गोष्ट आहे. जेव्हा धोनी यशोशिखरावर होता आणि त्याचवेळी त्या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करत स्टार झाली होती.

आता ही अभिनेत्री कोण याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल?

ओम शांती ओम या चित्रपटातून स्टार झालेल्या दीपिका पादुकोनवर धोनीचं क्रश होतं.

धोनीनं तिला सामना पाहायला येण्याचे निमंत्रणही दिलं होतं आणि ती स्टेडियममध्ये येऊन चिअर करतानाही दिसली होती.

पण, धोनीच्या नशीबी तिची साथ नव्हती. युवराज सिंगही दीपिकाच्या प्रेमात पडला होता.

धोनीला हे कळलं तेव्हा त्यानं मैत्री निवडली आणि प्रेमाचा त्याग केला.

युवराज सिंग आणि दीपिका यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही.

धोनीला याबाबत मीडियानं विचारलं तेव्हा त्यानं अफवा असल्याचं सांगितलं होतं, परंतु या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. अफवा अशीही होती की दीपिकाच्या सांगण्यावरून धोनीनं केसांची स्टाईल बदलली.

अर्थात या सर्व चर्चा रंगल्या होत्या आणि हे सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे नाही. त्या वेळी योगायोगानं घडलेल्या घटनांवरून हा तर्क लावला गेला.