ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीचे 'सरप्राईज पॅकेज'

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताने संघ बांधणी करायला सुरुवात केली आहे.

या विश्वचषकात कोणते खेळाडू खेळतील, याची नावे जवळपास ठरलेली आहेत.

भारतीय संघातील कोणते खेळाडू विश्वचषकासाठी मैदानात उतरतील, हे प्रतिस्पर्ध्यांनाही चांगलेच माहिती आहे.

त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना धक्का देण्यासाठी विराटने 'सरप्राईज पॅकेज' तयार केले आहे.

पण 'सरप्राईज पॅकेज' आहे तरी काय...

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संधी देण्यात येऊ शकते, असे संकेत कोहलीने दिले आहेत.

आयपीएलमध्ये कृष्णा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे कृष्णाची गोलंदाजी बऱ्याच खेळाडूंना माहिती नसल्याचे समजले जात आहे.