बाबो; 2019मध्ये ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट नववा!

2019या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2455 धावांचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नाववर आहे. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे, तर कोहली 1377 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत मात्र विराट 612 धावांसह दहाव्या स्थानावर आहे. ट्वेंटी-20तही कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट नवव्या स्थानावर आहे. त्यानं 466 धावा चोपल्या आहेत.

आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हा 2019या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थानी आहे. त्यानं 20 सामन्यांत 41.55 च्या सरासरीनं 748 धावा चोपल्या आहेत.

आयर्लंडचाच केव्हिन ओ'ब्रायन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 23 सामन्यांत एका शतकी खेळीसह 729 धावा केल्या आहेत.

नेदरलँड्सचा मॅक्स ओ'डोवड हा तिसऱ्या क्रमांकावर असून 24 सामन्यांत त्यानं 702 धावा केल्या आहेत. त्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

नेदरलँड्सचा बेन कूपर 21 सामन्यांत 637 धावा करून चौथ्या स्थानावर आहे.

आयर्लंडचा अँडी बॅल्बीर्नीनं 21 सामन्यांत 601 धावा केल्या.

पापुआ न्यू गिनीचा टोनी उरानं 17 सामन्यांत 47.66 च्या सरासरीनं 572 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 107 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

नेपाळचा पारस खडका यानं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं 18 सामन्यांत एका शतकासह 541 धावा केल्या.

स्कॉटलंडचा जॉर्ज मुन्सी हा या क्रमावारीत 8व्या स्थानावर येतो. त्यानं 15 सामन्यांत 526 धावा चोपल्या. त्यात नाबाद 127 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं 10 सामन्यांत 77.66च्या सरासरीनं 466 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 94 धावांची खेळी ही सर्वोत्तम ठरली आहे.

स्कॉटलंडचा कॅलम मॅकलीओड हा दहाव्या स्थानी आहे. त्यानं 15 सामन्यांत 440 धावा केल्या आहेत.