कुणी डॉक्टर, तर कुणी इंजिनियर; भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाबाबत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

Indian cricketers wives education: भारतात क्रिकेटपटूंबाबत फार लिहिलं, बोललं जातं. मात्र त्यांच्या पत्नींबाबत अपवाद वगळता फारशी चर्चा होत नाही. पण या क्रिकेटपटूंच्या पत्नीही त्यांच्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पतींच्या तोडीस तोड आहेत. काही क्रिकेटपटूंच्या पत्नी तर उच्चशिक्षित आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाविषयी...

भारतात क्रिकेटपटूंबाबत फार लिहिलं, बोललं जातं. मात्र त्यांच्या पत्नींबाबत अपवाद वगळता फारशी चर्चा होत नाही. पण या क्रिकेटपटूंच्या पत्नीही त्यांच्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पतींच्या तोडीस तोड आहेत. काही क्रिकेटपटूंच्या पत्नी तर उच्चशिक्षित आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाविषयी...

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची पत्नी नुपूर नागर हिने एमबीए केलं आहे. तसेच तिने ग्रेटर नोएडा येथे इंजिनियर म्हणूनही काम केलं आहे.

विराट कोहलीप्रमाणेच त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही तिच्या अभिनय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र अनुष्काने शिक्षण क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. अनुष्काने बीए केल्यानंतर इकॉनॉमिक्स ह्या विषयात मास्टर्सची पदवी घेतली आहे.

महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने ह़ॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. तिने औरंगाबादमधील इंस्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने कोलकाता येथील हॉटेलमध्ये कामही केले होते. त्याचवेळी धोनीची आणि तिची भेट झाल्याचे सांगण्यात येते.

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंह प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आहे. तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतिमा हिने सायकोलॉजी आणि फिजिकल एज्युकेशनमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने फिजिकल एज्युकेशनमध्ये मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतले आहे.

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही पदवीधर आहे. तसेच तिने स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षणही घेतले आहे. ती तिचा चुलत भाऊ बंटी सजदेहच्या कंपनीमध्ये काम करत होती.

डावखुरा फलंदाज सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिनेसुद्धा उच्च शिक्षण घेतलेले आहे. प्रियंकाकडे बी.टेकची डिग्री आहे. तसेच तिने एक्सेंचर आणि विप्रोसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही व्यवसायाने डॉक्टर आहे. तिने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. यादरम्यान तिने सुवर्णपदकही मिळवले होते.