'या' Hot खेळाडूसोबत टीम इंडियाच्या फलंदाजाला जायचंय डिनरला!

जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,456 वर गेली असून 423 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेताल देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अशात क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत.

याच चर्चांमध्ये टीम इंडियाचा फलंदाजानं ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूसोबत डिनरवर जाण्याची इच्छा व्यक्त केली

एलिसा पेरी असं या महिला खेळाडूचं नाव असून टीम इंडियाचा माजी सलामीवीर मुरली विजयनं तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.

व्हिडीओ चॅटींग करताना मुरलीनं दोन खेळाडूंसोबत डिनरला जायला आवडेल, असं मत व्यक्त केलं. या दोन व्यक्तिंमध्ये एलिसा पेरी आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.

एलिसा पेरीबद्दल तो म्हणाला,''एलिसा सुंदर आहे, तिच्यासोबत मला डिनरला जायला आवडेल.''