Asia Cup 2021 : आशिया चषक स्पर्धेत लोकेश राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व; BCCI टीम B मैदानावर उतरवणार, जाणून घ्या Playing XI

India likely to send second-string side for Asia Cup 2021 Lokesh Rahul Captain of Team B : आशिया चषक २०२१ स्पर्धेत BCCIचा टीम बी मैदानावर उतरवणार आहे. त्या संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

भारतीय संघानं ( India vs England Test Series) इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम सामन्यात प्रवेश केला. १८ ते २२ जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध ( India vs New Zealand) अंतिम सामना खेळणार आहे.

या अंतिम सामन्याच्या तारखांनी BCCIसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. याच कालावधीत आशिया चषक ( Asia Cup 2021) स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये खेळणार असल्यानं आशिया चषकातून माघार घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, अपडेट माहितीनुसार BCCI आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाचा 'B' संघ पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ( India likely to send second-string side for Asia Cup 2021)

आशिया चषकाचे आयोजन मागील वर्षी होणार होते, परंतु कोरोना व्हायरसच्या संकटामुळे तेव्हा ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. आशिया चषक यंदा जून महिन्याच्या अखेरीस होणार आहे आणि तेव्हा टीम इंडिया लंडनमध्ये असेल. अशात टीम इंडियाची दुसरी फळी कशी असेल ते पाहूया...

सलामीवीर - शिखर धवन कसोटी संघात खेळणार नसल्यानं मर्यादित षटकांच्या सामन्यात तो सलामीवीर आहे. त्यात लोकेश राहुलचीही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवड होणे अवघड आहे. त्यामुळे त्याच्याकडे आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

मधली फळी - विराट कोहली आशिया चषक खेळणार नसल्यानं श्रेयस अय्यर त्याची जबाबदारी सांभाळताना दिसेल. याशिवाय सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन यांना संधी मिळू शकते. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून भूमिका सांभाळेल, तर सॅमसनचा क्षेत्ररक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे तिघेही अष्टपैलू खेळाडू लंडन दौऱ्यावर असल्यानं आशिया चषक स्पर्धेसाठी ते उपलब्ध नाहीत. अशात राहुल टेवाटिया आशिया चषक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसू शकतो.

गोलंदाज - जसप्रीत बुमराह, इशान शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव हे सर्व जागतिक कसोटी फायनलसाठी लंडनमध्ये असतील. अशात युझवेंद्र चहल, टी नटराजन, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी यांच्यावर आशिया चषक स्पर्धेत जबाबदारी असेल.

आशिया चषक स्पर्धेतील संभाव्य प्लेइंग इलेव्हन - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, राहुल टेवाटिया, युजवेंद्र चहल, टी नटराजन, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी