चर्चा तर होणारच; क्रिकेटच्या मैदानावर अवतरली 'Miss World'!

क्रिकेट आणि ग्लॅमर हे एका नाण्याची दोन बाजू झाले आहेत. त्यामुळे जिथे क्रिकेट तिथे ग्लॅमर आलेच पाहिजे.

क्रिकेटच्या अनेक लीग आज जगभरात खेळल्या जात आहेत आणि त्यात समालोचन करताना अनेक तारका दिसत आहेत. पण, या तारकांमध्ये 'Miss World' दिसली तर?

होय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये 'Miss World' एरिन व्हिक्टोरिया हॉलंड दिसली आणि तिची चर्चा सुरू झाली.

ऑस्ट्रेलियन गायिका, टीव्ही होस्ट, मॉडल, डान्सर आणि सोशल वर्कर अशी अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेली व्हिक्टोरीया सोमवारी बिग बॅश लीगमध्ये समालोचन करताना दिसली.

2013मध्ये तिनं ' Miss World Australia' हे टायटल जिंकले. त्याचवर्षी तिला 'Miss World' च्या शर्यतीत उपविजेतेपद मिळाले.

विशेष म्हणजे एरिक ही ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग याची प्रेयसी आहे आणि 2020मध्ये ही जोडी विवाह बंधनात अडकणार आहे.