Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्या-आमच्यासाठी काय केला आहे संकल्प?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 06:43 AM2024-02-02T06:43:06+5:302024-02-02T06:53:08+5:30

Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे.

शालेय शिक्षणासाठी तरतूद वाढवून ७३ हजार काेटी रुपये करण्यात आली आहे. ‘पीएम-श्री’ शाळांसाठीची तरतूद दाेन हजार काेटी रुपयांनी वाढविण्यात आली आहे. शिक्षणाबाबत इतर कोणतीही मोठी घोषणा नाही.

अर्थसंकल्पात बेरोजगारांना थेट नोकऱ्यांचे आश्वासन नसले तरी पर्यटन, इलेक्ट्रिक बस, सोलार, विंड न्यूक्लीअर एनर्जी या क्षेत्रांना चालना देण्याच्या अनेक छोट्या-मोठ्या उपायांमुळे रोजगार निर्मिती साधली जाईल.

पायाभूत सुविधांसाठी विक्रमी तरतूद प्रस्तावित असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. पेंशनसंबंधित याेजनेसाठी निधी वाढवला आहे. मनरेगासाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ३१२ काेटी आणि प्रशाकीय सुधारणेसाठी १० काेटी रुपयांची तरतूद. नाेकरशाहीत सुधारणा करण्यासाठी ‘मिशन कर्मयाेगी’साठी ८६.१३ काेटी रुपये देणार.

छोट्या व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी वेगळ्या घोषणा नाहीत. मात्र, शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांनी निकट भविष्यात चालना मिळणार असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांना परताव्याचे पर्याय सापडतील.

पर्यटनाला चालना देण्याच्या उपायांमुळे या व्यवसायातील लोकांना थेट फायदा आणि रोजगार निर्माण होण्यास मदत हेईल. स्टार्टअपला चालना देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा आणखी एका वर्षाने वाढविण्यात आली.

तेलबियांच्या उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविण्याच्या उपायांचा देशातील बीज उद्योगाला लाभ होईल. मात्र, औषध बाजारासाठी काही विशेष तरतुदी नाहीत. कॉर्पोरेट कर ३० वरून २२ टक्क्यांवर आणला आहे.