shruti haasan birthday special : श्रुती हासनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या तिच्याविषयी या खास गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:05 PM2021-01-28T15:05:02+5:302021-01-28T15:05:02+5:30

श्रुती हासन ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका असून तिने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा आज वाढदिवस आहे.

श्रुती ही प्रसिद्ध अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारीका यांची मोठी मुलगी आहे.

श्रुती केवळ सहा वर्षांची असताना तिने कमल हासन यांच्या चाची ४२० या चित्रपटात गाणे गायले होते.

श्रुतीने कॅलिफॉर्नियामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

श्रुतीने लक या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली.

श्रुतीने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

श्रुती लवकरच वेलकम बॅक या चित्रपटात झळकणार आहे.

श्रुती हासन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.