नऊ वर्षांच्या चिमुरड्याने युट्युबवर २०२० मध्ये सगळ्यात जास्त केली कमाई, आकडा वाचून व्हाल थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:05 PM2020-12-21T17:05:14+5:302020-12-21T17:05:14+5:30

रायन काजी (Ryan Kaji) हा केवळ नऊ वर्षांचा असून २०२० मध्ये यूट्यूबवर सगळ्यात जास्त कमाई करणारा व्यक्ती ठरला आहे.

रायन अमेरिकेतील टेक्सास शहरात राहातो. त्याने युट्युबद्वारे या वर्षभरात प्रचंड कमाई केली आहे.

रायनने २९.५ मिलियन डॉलर म्हणजेच 220 करोड़ रुपयांची कमाई केली आहे. गेल्यावर्षी देखील युट्युबवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये रायनच अव्वल होता.

रायन काजीचे खरे नाव रायन गुआन आहे. त्याने २०१५ मध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. त्याच्या युट्युबवर तो गेम्सचे रिव्ह्यू करतो.

रायनच्या एका व्हिडिओला २ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज आहेत. यूट्यूबच्या इतिहासात सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या पहिल्या ६० व्हिडिओंमध्ये त्याच्या व्हिडिओचा समावेश होता. (फोटो- इंस्टाग्राम, रायन काजी)

रायनने निकेलोडिएन सोबत एक डील केली असून त्याची टिव्ही सिरिज लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रायनची लोकप्रियता प्रचंड असल्याने अनेक कंपन्या आपली खेळणी रिव्ह्यूसाठी त्याच्याकडे पाठवत असतात.

रायनची लोकप्रियता जगभर असून त्याच्या व्हिडिओजची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात.