PHOTO: रवीना टंडन शेअर केले मनालीहून लेटेस्ट फोटो, दिसली स्नोफॉलचा आनंद लुटताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 07:30 PM2020-12-04T19:30:00+5:302020-12-04T19:30:03+5:30

अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

रवीना टंडन करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा दिले. त्यानंतर तिने बिझनेसमन अनिल थंडानीशी लग्न केले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. (Photo Instagram)

रवीना टंडनचा पदार्पणाचा चित्रपट पत्थर के फूल सुपरहिट ठरला होता. ज्यासाठी तिला नवोदित कलाकाराचा फिल्मफेअरचा पुरस्कारही देण्यात आला होता. (Photo Instagram)

‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram)

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)

रवीना टंडन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती मजेदार पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. (Photo Instagram)

अलीकडेच तिने मनालीमध्ये देवीचे दर्शन घेतानाते आणि स्नो फॉलचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर 4.9 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.