Pornography case: दीड अब्ज रेव्हेन्यू, 30 कोटींचा प्रॉफिट...; राज कुंद्राच्या पॉर्न इंडस्ट्रीचा असा होता फ्यूचर प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 PM2021-07-27T16:42:16+5:302021-07-27T16:49:19+5:30

एका अधिकाऱ्याने सांगितले, की त्या पीपीटीमध्ये आम्हाला आणखी एक पेज सांपडले आहे. यात बॉलीफेम मिडिया लिमिटेडचे इस्टिमेट रेव्हेन्यू लिहिले आहे. पण...

राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणासंदर्भात सातत्याने अपडेट्स येत आहेत. सध्या राज कुंद्राला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. याच बरोबर या प्रकरणात आणखी काही खुलासेही समोर आले आहेत. (Pornography case Businessman Raj kundra plan B estimate earnings next three years)

पॉर्न प्रकरणाचा तपास लावत असलेल्या क्राइम ब्रांचने आपल्या चार्जशीटमध्ये कुंद्राशी संबंधित एका पावर पॉइंट प्रेझेंटेशनचाही उल्लेख केला आहे. यात बॉलीफेम कंपनीकडून होणाऱ्या भविष्यातील नफ्याचा उल्लेख केला आहे.

राज कुंद्राने बॉलीफेमला एका चॅटमध्ये आपला प्लॅन सांगितला होता. हा प्लॅन त्याने, अॅपल आणि गूगल प्लेने हॉटशॉट बंद केल्यानंतर सांगितला होता.

पुढील तीन वर्षांत होणार होती एवढी कमाई - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये पुढील तीन वर्षांच्या उत्पन्नाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. यानुसार, 2021-2022 मध्ये ग्रॉस रेव्हेन्यू 36,50,00,000 रुपये एवढा सांगण्यात आला आहे. यात 4, 76, 85, 000 रुपये एवढा नफा सांगण्यात आला आहे.

2022-23 मध्ये ग्रॉस रेव्हेन्यू 73,00,00,000 रुपये एवढा सांगण्यात आला आहे. यात 4,76,85,000 एवढा नफा सांगण्यात आला आहे. तसेच तिसऱ्यावर्षी, म्हणजेच 2023-24 मध्ये ग्रॉस रेव्हेन्यू 146,000,000 रूपये आहे. तर नेट प्रॉफिट 30,42,01,400 एवढा सांगण्यात आला आहे.

पावर पॉइंट प्रझेंटेशन आलं समोर - एका अधिकाऱ्याने सांगितले, की त्या पीपीटीमध्ये आम्हाला आणखी एक पेज सांपडले आहे. यात बॉलीफेम मिडिया लिमिटेडचे इस्टिमेट रेव्हेन्यू लिहिले आहे. मात्र, या पेजवर प्रोजेक्शन रेव्हेन्यू रूपयांत नाही, तर पोंडमध्ये आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात खर्चासंदर्भात लिहिण्यात आले आहे, की वर्ष 2021-22 मध्ये 3 लाख पौंड, वर्ष 2022-2023 मध्ये 3 लाख 60 हजार पौंड तर 2023-24 मध्ये 4 लाख 32 हजार पौंडची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

आता तपासाची दिशा बदलणार - नेट प्रॉफिट आणि ग्रॉस रेव्हेन्यूचे प्रोजेक्शन बॉलीफेमसाठीच आहे, की कुण्या इतर गोष्टीसाठी, हे या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलेले नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला हे दस्तऐवज उमेश कामतच्या अटकेनंतर मिळाले आहेत. मात्र, आता आमच्याकडे राज कुंद्रा असल्याने आपल्याला आणखी क्लिअरिटी मिळेल. या आधारे आम्ही पुढील सप्लिमेन्ट्री चार्जशीट न्यायालयात दाखल करू आणि बॉलीफेमशी संबंधित जे काही कन्फ्यूजन असेल, त्या दिशेनेही आमचा तपास सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात बदलला होता फोन - राज कुंद्राने फेब्रुवारी महिन्यात, हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि आपले नाव या प्रकरणात आल्यानंतर लगेचच आपला फोन बदलला होता, असेही समोर आले आहे.

14 दिवसांची पोलीस कोठडी - पोर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्राची अडचण कमी होण्याचे नाव नाही. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.