अभिनयापेक्षा लूक्समुळे चर्चेत असते नेहा शर्मा, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 07:08 PM2021-04-21T19:08:54+5:302021-04-21T19:08:54+5:30

इंटरनेट सेन्सेशन अभिनेत्रींच्या यादीत नेहा शर्माचेही नाव गणले जाते. बेधडक, बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

कधी सन किस्ड फोटो तर कधी बिकनीमधील बोल्ड फोटो काढत नेहा तिच्या चाहत्यांसह शेअऱ करत असते.

नेहा शर्माचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो. त्यामुळे ऑन एंड ऑफस्क्रीन लूकमधील प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात.

नेहा शर्माने 2007 साली तेलगु सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

‘तुम बिन २’, 'क्या सुपर कुल है हम' , 'यंगिस्तान' , 'यमला पगला दिवाना' आदि सिनेमांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली.

'तानाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात देखील नेहा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

नेहाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते.

नेहा सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.